न मानावी चिंता ।
कांहीं माझेविशीं आतां ॥१॥
ज्याणें लौकिक हा केला ।
तो हा निवारिता भला ॥ध्रु.॥
माझे इच्छे काय ।
होणार ते एके ठाय ॥२॥
सुखा आणि दुःखा ।
म्हणे वेगळा मी तुका ॥३॥
अर्थ
लोकांना तुम्ही आता माझ्याविषयी काही चिंता करू नका.ज्याने हा ऐवढा लौकिक वाढविला आज तो सर्व संकटाचे निवारण करण्यास समर्थ आहे. माझ्या इच्छेप्रमाणे कोणते काम होणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात सुखे आणि दुखे यांपेक्षा मी वेगळा आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.