अक्षई तें झालें – संत तुकाराम अभंग – 377

अक्षई तें झालें – संत तुकाराम अभंग – 377


अक्षई तें झालें ।
आतां न मोडे रचिलें ॥१॥
पाया पडिला खोले ठायीं ।
तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥
होतें विखुरलें ।
ताळा जमे झडती आलें ॥२॥
तुका म्हणे बोली ।
पुढें कुंटितचि जाली ॥३॥

अर्थ

आम्ही अक्षय अशी परमार्थ रूप इमारत उभी केली आहे ती आता मोडली जाणे शक्य नाही.या इमारतीचा पाया फार खोल आहे.तो सर्वाधार ब्राम्हापर्यंत पोहोचला आहे.ते स्थान असे आहे की, आणखी खाली खणता येणार नाही.आमचा हिशोब थोडासा चुकत होता.काही अव्यवस्था झाली होती. तुकाराम महाराज म्हणतात पण आता ताळाबरोबर जमला आहे.परमार्था विषयी बोलण्यासारखे आणखी काही राहिले नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.