याजसाठीं वनांतरा – संत तुकाराम अभंग – 375

याजसाठीं वनांतरा – संत तुकाराम अभंग – 375


याजसाठीं वनांतरा ।
जातों सांडुनियां घरा ॥१॥
माझें दिठावेल प्रेम ।
बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥
अद्वैताची वाणी ।
नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह ।
आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥

अर्थ

मी घर सोडून याच कारणासाठी वनात जात आहे.कारण हरीच्या सगुण रुपाबद्दल माझ्या मना मध्ये असणाऱ्या प्रेमाला ऐरव्ही दृष्ठ लागेल आणि त्यायोगाने माझ्या मना मध्ये भजन पूजन इत्यादीची जी शुद्ध भावना आहे ती जाऊन माझी बुद्धी कोरडी निष्काम होईल.तसे होऊ नये म्हणून मी अद्वैतशास्त्राच्या गोष्टी ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ”मी ब्रम्ह आहे”असे म्हणणे हा सुद्धा एक भ्रम आहे त्या भावनेचा भ्रम मी आपल्या मध्ये येऊ देणार नाही. (म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये भक्ती घडत नाही असे महाराजांना म्हणायचं आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.