जाणे भक्तीचा जिव्हाळा – संत तुकाराम अभंग – 374

जाणे भक्तीचा जिव्हाळा – संत तुकाराम अभंग – 374


जाणे भक्तीचा जिव्हाळा ।
तोचि दैवाचा पुतळा ॥१॥
आणीक नये माझ्या मना ।
हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥
नामरूपीं जडलें चित्त ।
त्याचा दास मी अंकित ॥२॥
तुका म्हणे नवविध ।
भक्ती जाणे तोचि शुद्ध ॥३॥

अर्थ

खरोखरच ज्याची भक्ती अतिशय जिव्हाळ्याचे आहे तो दैवाचा पुतळाच आहे.त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित असेल,तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला पटत नाही.हरीच्या नामारुपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे,त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण,कीर्तन,मनन इत्यादी नऊप्रकारची भक्ती करणे जाणतो ,तोच मनुष्य खरा शुद्ध मानवा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.