मनोमय पूजा – संत तुकाराम अभंग – 373

मनोमय पूजा – संत तुकाराम अभंग – 373


मनोमय पूजा ।
हेचि पढीयें केशीराजा ॥१॥
घेतो कल्पनेचा भोग ।
न मानेती बाह्य रंग ॥ध्रु.॥
अंतरींचें जाणे ।
आदिवर्तमान खुणे ॥२॥
तुका म्हणे कुडें ।
कोठें सरे त्याच्या पुढें ॥३॥

अर्थ

मनोमन केलेली पूजा त्या केशीराजाला फार आवडते.तुम्ही कल्पनेने जरी त्याला फल पुष्प नैवद्य अर्पण केले तरी त्याला ते मान्य आहे परंतू बह्योपाचाराचा थाट-माट केला तर ते देवाला मान्य नसते.हरी हा भक्तांच्या मनातील कायम शुद्ध स्वरूपाच्या भक्तीभावपूर्वक खुणा जाणतो.तुकाराम महाराज म्हणतात पण जर अंतकरणात खोटा भक्तीभाव असेल तर त्या हरी पुढे ते कसे चालेल ?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.