पाटीं पोटीं देव – संत तुकाराम अभंग – 372
पाटीं पोटीं देव ।
कैचा हरीदासां भेव ॥१॥
करा आनंदें कीर्तन ।
नका आशंकितमन ॥ध्रु.॥
एथें कोठें काळ ।
करील देवापाशीं बळ ॥२॥
तुका म्हणे धनी ।
सपुरता काय वाणी ॥३॥
अर्थ
मागेपुढे देव असताना मग भक्तांना कसले भय आले?म्हणूनच तुम्ही आनंदाने हरिकीर्तन करा कोणत्याही प्रकारचे भय किंवा शंका मनात धरू नका.देव आपल्या सोबत असल्यावर मग काळाचे काय सामर्थ्य चालणार आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आमचा धनी पूर्णपणे समर्थ असल्यावर आम्हाला कसली कमतरता आहे ?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.