बैसूं खेळूं जेवूं – संत तुकाराम अभंग – 371

बैसूं खेळूं जेवूं – संत तुकाराम अभंग – 371


बैसूं खेळूं जेवूं ।
तेथें नाम तुझें गाऊं ॥१॥
रामकृष्णनाममाळा ।
घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥
विश्वास हा धरूं।
नाम बळकट करूं ॥२॥
तुका म्हणे आतां ।
आम्हां जीवन शरणागतां ॥३॥

अर्थ

आम्ही जेथे जेथे जेवू-खाऊ खेळु कोणतेही कर्म करत राहू तेथे तुझे नाम घेत जाऊ.रामकृष्ण नामाची माळ आम्ही आमच्या गळ्यात म्हणजे कंठात घालू.हे नाव आम्हाला तारणारे आहे हा विश्वास मनात धरून आम्ही तुझे नाम अखंड घेण्यासाठी आजून दृढनिश्चय करू.तुकाराम महाराज म्हणतात आम्हा शरणागतांना जीवनात तुझे नाम घेणे आता एवढेच काम आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.