अनुतापें दोष – संत तुकाराम अभंग – 368

अनुतापें दोष – संत तुकाराम अभंग – 368


अनुतापें दोष ।
जाय न लगतां निमिष ॥१॥
परि तो राहे विसावला ।
आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥
हेचि प्रायिश्चत ।
अनुतापीं न्हाय चित्त ॥२॥
तुका म्हणे पापा ।
शिवों नये अनुतापा ॥३॥

अर्थ

याअगोदर झालेल्या वाईट कर्माचा पश्चाताप आला कि त्या पापाचे निवृत्ती एक क्षणही वयाला न जाता होते.पण तो पश्चाताप आपण असे पर्यंत टिकून राहिला पाहिजे तरच चांगले .अशा अनुतापामध्ये मनाला स्नान घडले पाहिजे मग ते झालेले प्रायश्चित्त खरे असते.तुकाराम महाराज म्हणतात अनुताप(केलेल्या वाईट कर्माविषयी झालेले प्रायश्चित्त) ज्यावेळेस होते त्यावेळेला पाप मनाला शिवत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.