तुटे भवरोग – संत तुकाराम अभंग – 366
तुटे भवरोग ।
संचितक्रियमाणभोग ॥१॥
ऐसें विठोबाचें नाम ।
उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥
वसों न सके पाप ।
जाय त्रिविध तो ताप ॥२॥
तुका म्हणे माया ।
होय दासी लागे पाया ॥३॥
अर्थ
एक विठोबा चे नाम असे आहे या नामाने भव रोगापासून आपल्याला सुटका करता येते संचित प्रारब्ध आणि क्रियमाण यांच्यापासून होणाऱ्या भोगाचाही त्यामुळे नाश होतो.असे हे विठोबाचे नाम पवित्र आहे त्याचे उच्चार केले असता जन्ममरण रुपी बाधा खंड ते.विठोबाचे नामस्मरण केल्यामुळे त्रिविध तापांचे नाश होतो व कोणत्याही प्रकारचे पाप होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे नामस्मरण इतके अवर्णनीय आहे कि ते सर्व जगाला भुलविणारी माया जे कोणी विठोबाचे नामस्मरण करतात ती माया त्याच्या चरणांची दासी होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.