विचारावांचून – संत तुकाराम अभंग – 365

विचारावांचून – संत तुकाराम अभंग – 365


विचारावांचून ।
न पविजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणांचा बांधा ।
माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥
देवाचिये चाडे ।
देवा द्यावें जें जें घडे ॥२॥
तुका म्हणे होतें ।
बहु गोमटें उचितें ॥३॥

अर्थ

विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही.विचार करताना हा देह त्रिगुणा पासून तयार झालेला आहे कोणताही गुण परमार्थ करण्यास अनुकूल नाही हा विचार करावा.त्यामुळे कोणतेही कर्म केलेले असो ते कर्म देवाला अर्पण करावे.तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे आपण कोणतेही कर्म देवाला अर्पण केले तर ते कर्म योग्य आणि उचित ठरते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.