नये जरी कांहीं ।
तरी भलतेचि वाहीं ॥१॥
म्हणविल्या दास ।
कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥
समर्थाच्या नांवें ।
भलतैसें विकावें ॥२॥
तुका म्हणे सत्ता ।
वरी असे त्या बहुतां ॥३॥
अर्थ
तुला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसेल तरी चालेल,मी हरीचा दास आहे असे जरी तू म्हटले तरी तुला जन्म मृत्यूचा कोणीही वेठीस धरणार नाही.कारण श्री हरीचे नाम हे समर्थ आहे व त्याचे नाव घेतले तर मग कोणताही माल म्हणजे कोणताही मनुष्य जन्म मृत्यूच्या तावडीतून सुटतो.तुकाराम महाराज म्हणतात त्या समर्थाची सत्ता सर्वांवर असते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.