नसे तरी मनी नसो ।
परी वाचे तरी वसो ॥१॥
देह पडो या चिंतनी ।
विठ्ठलनामसंकीर्तनी ॥ध्रु.॥
दंभस्फोट भलत्या भावें ।
मज हरीजन म्हणावावे ॥२॥
तुका म्हणे काळांतरी ।
मज सांभाळील हरी ॥३॥
अर्थ
एखाद्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल तरी चालेल परंतु त्याच्या वाणीमध्ये भगवंताचे नामस्मरण चालू पाहिजे.विठ्ठलाचे नामस्मरण करीत त्याचे नाम चिंतन करीत माझा देह पडावा अशी माझी इच्छा आहे.मग मला लोकांनी दांभिक म्हटले तरी चालेल परंतु तुझे नामस्मरण नित्य माझ्या वाणीत वसु देलोकांनी मी तुझा हरिभक्त आहे असे म्हंटल्यावर मला नाव ठेवले तरी चालेल.तुकाराम महाराज म्हणतात येवढेच जरी केले तरी काही काळानंतर माझा सखा हरी हा माझे रक्षण करील असा विश्वास मनात ठेवावा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.