पराविया नारी माउलीसमान ।
मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करितां परनिंदा द्रव्य अभिळास ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥
बैसलिये ठायी म्हणतां रामराम ।
काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥
संताचे वचनीं मानितां विश्वास ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥
खरें बोलतां कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी ।
आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥
अर्थ
वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाने परस्त्रीला मातेसमान मानल्याने कोणतेही नुकसान होत काय? परनिंदा, परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय? एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याही प्रकारचे श्रम होते ते काय सांगा?संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो; त्यात तुमचे नुकसान मात्र काही होते काय? सत्य बोलन्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही तुमचे नुकसान मात्र काही होते काय? तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध आचरनाने देह-बुद्धि परमेश्वराशी जोडलि जाते, त्याला इतर कर्माचि आवशकता भासत नाही.
(Meaning In English :-Is there any harm in considering a foreign woman as a mother as promised by the Warkari sect? Is there any harm in slandering and not having material desires? What is the use of memorizing Harinam while sitting in one place? What is the benefit of believing in the words of saints? Is there any harm in that? It doesn’t take much effort to tell the truth, but does it hurt you? Tukaram Maharaj says that by such pure conduct the body-intellect is connected with the Lord, he does not feel the need for other karma.)
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.