जें जें जेथें पावे – संत तुकाराम अभंग – 359
जें जें जेथें पावे ।
तें तें समर्पावें सेवे ॥१॥
सहज पूजा याचि नांवें ।
गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥
अवघें भोगितां गोसावी ।
आदीं आवसानीं जीवी ॥२॥
तुका म्हणे सिण ।
न धरितां नव्हे भिन्न ॥३॥
अर्थ
या संसारामध्ये जे जे काही प्राप्त होईल तेते देवाच्या सेवेकरता देवाला समर्पण करावे.यालाच सहज पूजा असे म्हणतात आणि हीच पूजा घडण्याकरता आपला अभिमान मात्र गळून गेला पाहिजे.जीवाच्या आधीपासून अंती पर्यंत सर्व भोग हा श्रीहरीच भोगत आहे असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे मी भोक्ता आहे व हे सर्व भोग माझे आहेत हा अभिमान बाजूला ठेवला तर भगवंता मध्ये व आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.