करावें चिंतन -संत तुकाराम अभंग – 358
करावें चिंतन ।
तेचि बरें न भेटून ॥१॥
बरवा अंगीं राहे भाव ।
तंग तोचि जाणा देव ॥ध्रु.॥
दर्शणाची उरी ।
अवस्थाचि अंग धरी ॥२॥
तुका म्हणे मन ।
तेथें सकळ कारण ॥३॥
अर्थ
देवाला न भेटता त्याचे चिंतन करत रहावे हेच उत्तम.देवाला न भेटता देवाचे चिंतन करणे हा जो अंगी असलेला भक्तीभाव आहे तो सर्वोत्तम आहे कारण तो भक्तीभाव देवाला भेटण्याकरता आतुर झालेला असतो व असे ज्याच्या मनी असेल त्यालाच देव समजावे.देवाची भेट झाली नसल्यामुळे देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याचे मन आतुर झालेले असतात.तुकाराम महाराज म्हणतात देवाचे चिंतन व देवाचे ध्यान हे देवाच्या वियोगातच होते म्हणजे त्याची भक्ती होते व ती भक्ती इतकी प्रबळ असते कि तो भक्त भक्तीनेच देव होतो हे सर्व होण्याला कारण म्हणजे मन असते कारण मनाला देवाच्या भेटीची आवड लागलेली असते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.