सत्य तो आवडे ।
विकल्पानें भाव उडे ॥१॥
आम्ही तुमच्या कृपादानें ।
जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥
आला भोग अंगा।
न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका म्हणे देवा ।
अंजन ते तुझी सेवा ॥३॥
अर्थ
जे सत्य म्हणजे हरी आहे ते आवडते पण जे सत्य आहे याविषयी संशय धरला तर त्यावरील विश्वास उडतो.तुमच्या कृपादाना मुळेच तर आम्हाला ह्या गोष्टी समजल्या आहेत शुद्ध सोने कोणते व अशुद्ध सोने कोणते हे समजल्यावर अशुध्दाचा त्याग केला जातो.त्यामुळे आता आम्हाला खरे सुख व खोटे सुख कळून आले आहेत. खोटे सुख आम्हाला लाभले तर त्याचा त्याग आम्ही पटकन त्याग करू कोणताही उशिरा लागू देणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा खरे खोटे समजण्याकरता बुद्धी रुपी डोळ्यांमध्ये विवेकरुपी अंजन असणे गरजेचे आहे आणि त्याकरिता तुझीच सेवा करणे आवश्यक आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.