सत्य साचे खरें ।
नाम विठोबाचें बरें ॥१॥
येणें तुटती बंधनें ।
उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥
भाव ज्याचे गांठी ।
त्यासी लाभ उठाउठी ॥२॥
तुका म्हणे भोळा ।
जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥
अर्थ
या जगतामध्ये सत्य बरोबर आणि खरे काही असेल तर ते विठोबाचे नाम आहे आणि तेच बरे आहे.या नामाने संसारातील भावबंधन तुटतात व इह परलोकी आपली कीर्ती राहते.ज्याच्या मनामध्ये हरी विषयी विठ्ठला विषयी विश्वास दृढ आहे त्यालाच हरीची भेट त्वरित होते.तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतरामध्ये विठ्ठला विषयी भोळी भक्ती असते त्याला कळीकाळाला कसे जिंकावे हे चांगले समजते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.