भवसिंधूचें काय कोडें – संत तुकाराम अभंग – 354

भवसिंधूचें काय कोडें – संत तुकाराम अभंग – 354


भवसिंधूचें काय कोडें ।
दावी वाट चाले पुढें ॥१॥
तारूं भला पांडुरंग ।
पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥
मागें उतरिलें बहुत ।
पैल तिरीं साधुसंत ॥२॥
तुका म्हणे लाग वेगें ।
जाऊं तयाचिया मागें ॥३॥

अर्थ

अरे जर स्वतः पांडुरंग परमात्माच आपल्याला या भवसागरातून तारण्यासाठी आपल्या पुढे चालत आहे मग तुला यापलीकडे जाण्यासाठी काय अवघड आहे?हा पांडुरंग परमात्मा एक उत्कृष्ट नावाडी आहे तो तुला या भावासागारातील पाणी तुझ्या अंगालाच काय तर हात पाय यांनासुद्धा लावू देणार नाही थोडेदेखील पाणी तुझ्या हाता व पायांना लागणार नाही.यांच्या आधाराने तर पूर्वी अनेक साधुसंत हा भवसागर तरुन गेलेले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आपणही त्या पांडुरंगाच्या मागे तत्परतेने धावत जाऊ.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.