नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी – संत तुकाराम अभंग – 353

नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी – संत तुकाराम अभंग – 353


नामपाठ मुक्ताफळांच्या ओवणी ।
हें सुख सगुणीं अभिनव ॥१॥
तरी आम्ही जालों उदास निर्गुणा ।
भक्तांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥
द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव ।
जाय ठाया ठाव पुसोनियां ॥२॥
तुका म्हणे आतां अभयदान करा ।
म्हणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥३॥

अर्थ

हरीच्या सगुणरूप भक्तीमार्गात एक वेगळाच आनंद आहे तो म्हणजे हरी नामरूपी मोत्याची माळ ओवली जाते.म्हणूनच तर आम्हीही निर्गुणाच्या विषयी उदास झालो आहे कारण आम्हाला मोक्ष हा मुळीच आवडत नाही.देवा तुझ्या ह्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला देण्या-घेण्याचा व इतर कोणताही व्यवहार करता येतो पण जर एकदा तुझ्या निर्गुण स्वरूपाचे ज्ञान झाले तर मग तुझ्या सगुण स्वरूपाचे जे व्यवहार करतो ते सर्व व्यवहार त्याचा ठावठिकाणा पुसून जाते.तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा मला असे अभय द्या कि “मी तुला अभयदान दिले” असे तुम्ही एकदा मला म्हणा म्हणजे मला सर्व मिळाले असे समजणे योग्य.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.