मोक्ष तुमचा देवा – संत तुकाराम अभंग – 352
मोक्ष तुमचा देवा ।
तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥१॥
मज भक्तीची आवडी ।
नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥
आपल्या प्रकारा ।
करा जतन दातारा ॥२॥
तुका म्हणे भेटी ।
पुरे एकचि शेवटीं ॥३॥
अर्थ
हे देवा तुमचा तो असणारा मोक्ष तुमच्या जवळच ठेवा.मला त्या मोक्षाचे अंतरापासून आवड नाही मला फक्त तुमच्या भक्तीची आवड आहे.हे देवा तुमच्याजवळ असे विविध प्रकारचे मोक्ष असतील किंवा अनेक प्रकारचे दान असतील ते तुम्ही तुमच्या जवळच ठेवा ते तुम्हीच जतन करून ठेवा.तुकाराम महाराज म्हणतात मला शेवटी तुमचे दर्शन तुमची भेट होणे एवढेच महत्त्वाचे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.