सांठविला हरी – संत तुकाराम अभंग – 351

सांठविला हरी – संत तुकाराम अभंग – 351


सांठविला हरी ।
जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥
त्यांची सरली येरझार ।
जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥
हरी आला हाता ।
मग कैंची भय चिंता ॥२॥
तुका म्हणे हरी ।
कांहीं उरों नेदी उरी ॥३॥

अर्थ

ज्यांनी कोणी या हरिला आपल्या हृदयरूपी मंदिरात आत्मतत्वाने साठविले आहे, त्यांची जन्ममरण रुपी येरझार संपली व त्यांनी केलेले सर्व व्यवहार हे सफल झाले.प्रत्यक्ष जर हरीच हातात आला म्हणजे हरी आपला झाला तर मग कसली भय आणि कसली चिंता.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी जर प्रसन्न झाला तर मग तो भक्तांचे मागे कोणतेही कर्म व विकार उरू देत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.