संत तुकाराम अभंग

होईन भिकारी – संत तुकाराम अभंग – 350

होईन भिकारी – संत तुकाराम अभंग – 350


होईन भिकारी ।
पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेम धर्म ।
मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु.॥
हेचि माझी उपासना ।
लागेन संतांच्या चरणा ॥२॥
तुका म्हणे देवा ।
हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

अर्थ

हे देवा मी भिकारी होईन पण पंढरीचा वारकरी होईल.मुखाने विठोबाचे नाम घेणे हा माझा मुख्य धर्म आहे व हाच माझा नित्य नेम आहे.संतांच्या चरणांवर माझे मस्तक ठेवणे हिच माझी उपासना आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि हे देवा हिच माझी भोळी सेवा आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *