आम्ही सदैव सुडके ।
जवळीं येतां चोर धाके ।
जाऊं पुडी भिकें ।
कुतरीं घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा ।
नाहीं तरी वांयां भागा ।
थोरपण अंगा ।
तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
अक्षय साचार ।
केलें सायासांनी घर ।
एरंडसी हार ।
दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरीं ।
पोट भरे भिकेवरी ।
जतन तीं करी ।
कोण गुरें वासरें ॥३॥
जाली सकळ निश्चिंती ।
भांडवल शेण माती ।
झुळझुळीत भिंती ।
वृंदावनें तुळसीचीं ॥४॥
तुका म्हणे देवा ।
अवघा निरविला हेवा ।
कुटुंबाची सेवा ।
तोचि करी आमुच्या ॥५॥
अर्थ
आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत; त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते . आम्ही घर सोडून भिक्ष्या मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराच राखन करतात .अशी हरी भक्तिचि ख्याति आहे, हरी भक्तिमुळे आम्हाला थोरपंण लाभल आहे .आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजुक लाकडे वापरली आहेत ते घर अक्षय आहे , एरांडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत ते दुसऱ्या कुणाची भर सहन करत नाही.आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भीक्षा मागतो, गुरेढोरे त्यांचा गोठा याचे कोण रक्षण करत बसेल?आम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत आमचे भाडंवल म्हणजे शेण , माती आहे आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेचआमचे तुळशीवृदावंन लखलखित झालेले दिसते .तुकाराम महाराज म्हणतात देवने आमचा सर्व हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे, असे आम्ही नशीबवान आहोत .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.