बोल बोलतां वाटे सोपें – संत तुकाराम अभंग – 349
बोल बोलतां वाटे सोपें ।
करणी करितां टीर कांपे ॥१॥
नव्हे वैराग्य सोपारें ।
मज बोलतां न वाटे खरें ॥ध्रु.॥
विष खावें ग्रासोग्रासीं ।
धन्य तोचि एक सोसी ॥२॥
तुका म्हणे करूनि दावी ।
त्याचे पाय माझे जीवीं ॥३॥
अर्थ
वैराग्याच्या गप्पा मारणे हे सोपे आहे पण प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण आहे त्या वेळेस ढुंगण फाटते.वैराग्य सोप्पे नाही रे बाबा आहो आम्हाला जर कोणी म्हटले आम्ही वैराग्यशील आहोत तर ते आम्हाला खरे वाटणार नाही.प्रत्येक घासाघासाला विष सहन करावे लागते आणि जो कोणी ते सहन करतो तो धन्य आहे.तुकाराम महाराज म्हणतात आणि जो कोणी असे करून दाखवीन त्याचे पाय मी माझ्या चित्तातधारण करेल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.