काय दरा करील वन ।
समाधान नाहीं जंव ॥१॥
तरी काय तेथें असती थोडीं ।
काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥
रिगतां धांवा पेंवामध्यें ।
जोडे सिद्धी ते ठायीं ॥२॥
काय भस्म करील राख ।
अंतर पाख नाहीं तों ॥३॥
वर्णआश्रमाचे धर्म ।
जाती श्रम जालिया ॥४॥
तुका म्हणे सोंग पाश ।
निरसे आस तें हित ॥५॥
अर्थ
जोपर्यंत मनामध्ये पूर्णपणे समाधान पूर्वक अंतकरण तयार होत नाही तोपर्यंत मग तो मनुष्य कितीही वनांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन राहिला तरी काय उपयोग आहे काय? जर तसे काही असते तर जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी आहेत त्यांना त्याचा लाभ झाला नसता?जर धान्याचे कोठार म्हणजे पेवे मध्येशिरले तर लगेच अन्न खाता येईल काय?अंतःकरण जर शुद्ध नसेल तर कितीही यज्ञकुंडातील राख अंगाला लावली असली तरी काही उपयोग आहे काय?वर्णाश्रम धर्माचा मनुष्याला कंटाळा आला तर तो त्याचा त्याग करतो.तुकाराम महाराज म्हणतात साधकावस्थेमध्ये असताना आशेचा पूर्णं निरास होणे महत्त्वाचे असते बाकी सर्व प्रयत्न म्हणजे एक प्रकारचे सोंग होय.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.