ब्रम्ह न लिंपे त्या मळें ।
कर्माअकर्मा वेगळें ॥१॥
तोचि एक तया जाणे ।
पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥
शोच अशौचाचे संधी ।
तन आळा तनामधीं ॥२॥
पापपुण्या नाही ठाव ।
तुका म्हणे सहज भाव ॥३॥
अर्थ
ब्रम्ह कधीही पाप आणि पुण्य या मलाने लिप्त होत नाही कारण ते कर्म आणि अकर्म यापासून वेगळे आहे. ज्याने कोणी ब्रम्ह स्वरूपाचा अनुभव घेतला आहे तोच त्याचे स्वरूप जाणू शकतो.जसे गवताचे आळे असून त्यातच गवत असते तसेच ते ब्रम्ह शुद्ध आणि अशुद्ध यांच्या पलीकडील आहे जरी त्याचा यांच्याशी संबंध असला तरी.तुकाराम महाराज म्हणतात ज्या ठिकाणी सहजच ब्रम्ह भाव असतो त्या ठिकाणी पापपुण्यला जागा नसते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.