संत तुकाराम अभंग

मन वोळी मना – संत तुकाराम अभंग – 345

मन वोळी मना – संत तुकाराम अभंग – 345


मन वोळी मना ।
बुद्धी बुद्धी क्षण क्षणां ॥१॥
मीच मज राखण जालों ।
ज्याणें तेथेचि धरिलों ॥ध्रु.॥
जें जें जेथें उठी ।
तें तें तया हातें कुंटी ॥२॥
भांजणी खांजनी ।
तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥

अर्थ

माझे मन माझ्या मनाला व बुद्धी बुद्धीला वळवीत आहे.अशाप्रकारे मीच माझा राखणदार झालो आहे व इंद्रिय विषयांकडे धाव घेणार तोच मी त्यांना थांबवीत आहेत.मन बुद्धी चित्त अहंकार यांच्या ठिकाणी जे काही विकार निर्माण होतात त्याचे मन व बुद्धी हेच त्यांना खुंटी घालतात.तुकाराम महाराज म्हणतात मनातील विचारांची भरती आणि ओहोटी उदय आणि विलय यांचा मी साक्षी राहिलो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *