संत तुकाराम अभंग

निगमाचें वन – संत तुकाराम अभंग – 344

निगमाचें वन – संत तुकाराम अभंग – 344


निगमाचें वन ।
नका शोधूं करूं सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरीं ।
बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥
पीडलेती भ्रमें ।
वाट न कळतां वर्में ॥२॥
तुका म्हणे भार ।
माथा टाका अहंकार ॥३॥

अर्थ

निगमाचे वन म्हणजे वेद रुपी आरण्य व त्यामध्ये हरीला शोधण्याचा व्यर्थ शिण करून घेऊ नका.तुम्हाला जर तो देव पाहायचाच असेल तर मी त्याचा पत्ता तुम्हाला सांगतो त्याने दही व दुधाची मटकी फोडली म्हणून यशोदा मातेने त्याला उखाळशी बांधून ठेवले आहे.हरी ची प्रति कशी करून घ्यावी याचे वर्म तुम्हाला न कळल्यामुळे तुम्ही व्यर्थ हे गोंधळात पडलेले आहात.तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो तुम्ही तुमच्या चित्तात असलेला अहंकार टाकून द्या मग तुम्हाला सुखाने हरीची प्राप्ती होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *