कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज – संत तुकाराम अभंग – 343
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज ।
वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा ।
कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं ।
जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं ।
कैसी स्थिती मती दावीं मज ॥३॥
तुका म्हणे जैसें दास केलें देवा।
तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.