लक्षूनियां योगी पाहाती आभास – संत तुकाराम अभंग – 342

लक्षूनियां योगी पाहाती आभास – संत तुकाराम अभंग – 342


लक्षूनियां योगी पाहाती आभास ।
तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा ।
सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥
व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी ।
सकळां अंतरीं निर्वीकार ॥२॥
रूप नाहीं रेखा नाम ही जयासी ।
आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥३॥
अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार ।
कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥
अचेत चेतलें भक्तीचिया सुखें ।
आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥

अर्थ

योगी लोक जे प्रयत्न करुन ध्यानधारणा करून हरीचे अस्पष्ट रूप पाहतात या स्वरूपाचा त्यांना फक्त आभास होतो हे स्वरूप आम्हा भक्तांना साक्षात स्पष्ट दिसते. दोन्ही कर कटेवर ठेवून तो विटेवर उभा आहे व त्याची अंगकांती ही सावळी व दैदीप्यमान आहे.त्याने सर्व व्यापूनही तो सर्वांपेक्षा वेगळा आहे व सर्वांच्या आत राहूनही तो निर्विकार आहे. ज्याला कसले ही नाम नाही रूप नाही अशा स्वरूपाचे मी मनामध्ये ध्यान करतो.ज्याला अंत नाही पार नाही कोणत्याही प्रकारचे वर्ण नाही जाती नाही कुळ नाही हात नाही पाय नाही कोणत्याही प्रकारचे अवयव नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे असे परब्रम्ह भक्तांच्या सुखा करिता सगुणसाकार झाले आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.