आतां मी अनन्य येथें अधिकारी – संत तुकाराम अभंग – 341
आतां मी अनन्य येथें अधिकारी ।
होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥
पुराणींचा अर्थ आणितां मनास ।
होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥
इंद्रियांचे आम्ही पांगिलों अंकित ।
त्यांच्यारगें चित्त रंगलेसे ॥२॥
एकाचें ही मज न घडे दमन ।
अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥
तुका म्हणे जरी मोकलिसी आतां ।
तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥
अर्थ
मी कोणत्या साधनेने तुमच्या भक्तीचा अनन्याधिकारी होईन हे मला समजत नाही.पुराणातील अर्थ मनात आणला कि भक्तीमध्ये किती मन विरक्त करावे लागते याचा विचार केला की माझे मन कासावीस होते.कारण आम्ही इंद्रियाचे पूर्णपणे अंकित झालो आहोत त्या इंद्रियांच्या विषयांतच आम्ही रंगून गेलो आहोत.हे देवा मला एकाच इंद्रियांचे दमन करता येत नाहीतर सर्व इंद्रियांना मी ताब्यात कसे ठेवू?तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता तुम्ही जर आता उपेक्षा बुद्धीने माझा त्याग कराल तर मी पूर्णपणे वाया गेलो असे समजा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.