आणीक दुसरें मज नाहीं आतां – संत तुकाराम अभंग – 340

आणीक दुसरें मज नाहीं आतां – संत तुकाराम अभंग – 340


आणीक दुसरें मज नाहीं आतां ।
नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।
जागृती स्वप्नी पांडुरंग ॥ध्रु.॥
पडिले वळण इंद्रियां सकळा ।
भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण ।
तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥

अर्थ

माझ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही या गोष्टीचा मी आता मनापासून निश्चय केला आहे.माझ्या ध्यानामध्ये ही पांडुरंग आहे आणि मनामध्येही पांडुरंग आहे जागृतीत पांडुरंग आहे स्वप्नामध्ये पांडुरंग आहे.माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले आहे एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंद्रिय धावत घेत नाही दुसरा कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी मला ज्याची ओळख करुन दिली आहे त्याचे ते सगुणरूप विटेवर उभे आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.