जया नाहीं नेम एकादशीव्रत – संत तुकाराम अभंग – 34

जया नाहीं नेम एकादशीव्रत – संत तुकाराम अभंग – 34


जया नाहीं नेम एकादशीव्रत ।
जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे ।
रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन ।
नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव ।
त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड ।
प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय ।
कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥

अर्थ
जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा .काळही त्याच्यावर रागाउन करकरा दांत खात असतो .ज्याच्या दारामधे तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशाणा प्रमाणे आहे .ज्याच्या कुळा मध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदि च्या त्रिविध तापात बुडते . ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे .तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकडा प्रमाणे असतात, असे मानावे.


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


जया नाहीं नेम एकादशीव्रत – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.