पूर आला आनंदाचा ।
लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठलसांगडी ।
पोहुनि जाऊं पैल थडी ।
अवघे जन गडी ।
घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
हें तों नाहीं सर्वकाळ ।
अमुप अमृतांचें जळ ॥२॥
तुका म्हणे थोरा पुण्यें ।
ओघ आला पंथें येणें ॥३॥
अर्थ
हरी भजनाचा आनंद घेताना आनंदाचा महापूर आला आहे व या महापुरात हरी प्रेमा विषयी लाटा उसळत आहे.या विठ्ठलनामाचे सांगडी आपण आपल्या कमरेला बांधून या भवसागराच्या पलीकडे पोहून जाऊ. अरे माझ्या भाईनों तुम्ही सर्वजण यामध्ये उडी मारा.आता सुदिन पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या भजन नदीत आनंदाने उडी मार येथे अमृत रुपआनंदाचे पाणी कमी पडणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्याई आहे त्यामुळे हा भक्तीमार्गाचा ओघ आपल्याकडे आला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.