तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं – संत तुकाराम अभंग – 338

तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं – संत तुकाराम अभंग – 338


तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं ।
दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥
सहस्रमुखें शेष सिणला बापुडा ।
चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता ।
निर्गुणा सच्चिदानंद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा ।
होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥
तुका म्हणे जरी दाविसी आपणा ।
तरिच नारायणा कळों येसी ॥४॥

अर्थ

तुझे वर्णन हे विठ्ठला तूच ते करू शकतो पण तुझे वर्णन करू शकेल असा या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही.सहस्र मुख असलेला शेष बापुडा तुझे वर्णन करून करून थकला शेवटी त्याच्या जीव्हाला चिरा पडल्या पण तो तुझे वर्णन पूर्ण करू शकला नाही.कारण हे नारायणा तू अव्यक्त अलक्ष अनंत आनंदरूप निर्गुण सच्चिदानंदरुप आहेस.ज्याचा जसा तुझ्याविषयी भाव असेल तसे रुप घेऊन तू सगुणसाकार होतो.तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तू जर आम्हाला स्वतः तिचे रूप दाखवले तरच आम्हाला कळून येईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.