स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा – संत तुकाराम अभंग – 337

स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा – संत तुकाराम अभंग – 337


स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा ।
तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखें ।
रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती ।
रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥
तुका म्हणे तूं ऐसा एक साचा ।
ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥

अर्थ

तुमची स्तुती करायला मी करेन पण देवा जिथे वेदाला ही तुमची स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही तेथे माझ्या स्तुतीचा काय प्रभाव पडणार आहे.पण काय करणार देवा तुझी स्तुती करण्यासाठी माझी जिव्हा लाचावली आहे तुझी स्तुती करण्यासाठी माझी इच्छा होत आहे.पण देवा तुमची स्तुती करण्याइतकी माझी बुद्धी पुरेशी नाही कारण तुमच्या एका रोमा वर अनेक ब्रह्मांडे होतात आणि जातात.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आहो तुम्ही या जगतामध्ये तुम्हीच खरे व्यापक आहात आणि तुमच्या स्वरूपाचे वर्णन कोणी करू शकेल अशी कोणाची वाचा असू शकत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.