सकळीच्या पायां माझी विनवणी – संत तुकाराम अभंग – 333
सकळीच्या पायां माझी विनवणी ।
मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन ।
बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल ।
तेथे मी हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी ।
उतरला कसीं खरा माल ॥३॥
अर्थ
सर्वांच्या चरणी मी मस्तक ठेवून अशी विनंती करीत आहे, जे कोणी श्रोता असेल किंवा वक्ता असेल या सर्वांनी जे काही खरे आहे हे पारखुन त्याचा स्वीकार करा.नामसंकिर्तन धान्याचा भांडार मी फोडला आहे याचा मालक म्हणजे तो विठ्ठल परमात्मा आहे मी फक्त तो माल वाहण्याचे हमाली करीत आहे.तुकाराम महाराज म्हणतात या नामरूपी मालाचे सामर्थ्य सगळीकडे पसरले आहे संतांच्या पारखीने तो माल खऱ्या कसाला उतरला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.