कोण सांगायास – संत तुकाराम अभंग – 332
कोण सांगायास ।
गेलें होतें देशोदेश ॥१॥
जालें वार्या हातीं माप ।
समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥
कोणाची हे सत्ता ।
जाली वाचा वदविता ॥२॥
तुका म्हणे या निश्चयें ।
माझें निरसलें भय ॥३॥
अर्थ
देवाचा महिमा सांगण्यासाठी कोणी देशोदेशी फिरले होते काय? पण माझा बाप हा पांडुरंग हा समर्थ आहे कि त्याची कीर्ति चे माप वाऱ्या हाती झाले आहे वाऱ्याच्या सरशी त्याचे अलौकिक सामर्थ्य सर्व जगात पसरलेले आहे.या जगामध्ये अशी कोणाची सत्ता आहे तर या परमात्म्यचीच ही सत्ता आहे त्याच्या सत्तेने सर्वजण बोलतात सर्वांना प्रेरणा मिळते.तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये विठ्ठलाचीच सर्व सत्ता आहे असा माझा दृढ निश्चय झाला असून त्या कारणामुळे मला कसलेही भय राहिले नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.