माप म्हणे मी मवितें – संत तुकाराम अभंग – 331

माप म्हणे मी मवितें – संत तुकाराम अभंग – 331


माप म्हणे मी मवितें ।
भरी धणी ठेवी रितें ॥१॥
देवा अभिमान नको ।
माझे ठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥
देशी चाले सिका ।
रितें कोण लेखी रंका ॥२॥
हातीं सूत्रदोरी ।
तुका म्हणे त्याची थोरी ॥३॥

अर्थ

माप म्हणते मी धान्य मोजतो त्यामुळे मी श्रेष्ठ आहे पण त्याचा जो धनी आहे मालक आहे तो त्यामध्ये धान्य ओततो एरवी त्याला रिकामेच ठेवतो.देवा माझ्या ठिकाणी असा अभिमान निर्माण होऊ देऊ नका.देशांमध्ये जो सत्ताधारी राजा असतो त्याच्याच शिक्क्याला महत्त्व असते त्याच्याशिवाय दुसऱ्या कशालाही महत्त्व नसते.तुकाराम महाराज म्हणतात या जगात खऱ्या सत्तेचे सूत्र ज्याच्या हातात असते त्याचीच थोरी या जगामध्ये असते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.