नव्हे शब्द एक देशी – संत तुकाराम अभंग – 330

नव्हे शब्द एक देशी – संत तुकाराम अभंग – 330


नव्हे शब्द एक देशी ।
सांडी गिवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी ।
विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥
मोकलिलें जावें बाणें ।
भाता जेणे वाहिला ॥२॥
आतां येथें कैचा तुका ।
बोले सिका स्वामीचा ॥३॥

अर्थ

माझे शब्द म्हणजे कोण्या एका मताचे खंडन किंवा मंडन करणारे नाहीत किंवा अर्थ सांगणारे नाहीत.माझी वैखरी वाणी म्हणजे विश्वव्यापक परमात्मा त्याच्याप्रमाणेच आहे.ज्याप्रमाणे भात्याने बाणाला बरेच दिवस राखलेले असते परंतु बाण त्याला सोडून धनुष्याला धरून बाहेर सुटतो त्याप्रमाणे माझी वाणी या परमात्म्याच्या आधारावर जगत असते व ते या परमात्मा वाचून अन्य कोठेही मोकाटपणे जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात आता येथे मी बोलत नसून माझ्या प्रत्येक शब्दावर माझ्या स्वामीचा म्हणजे या विठ्ठल परमात्मा चा शिक्का आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.