सदा तळमळ – संत तुकाराम अभंग – 33
सदा तळमळ ।
चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचें दर्शन न व्हावें ।
शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥
कुशब्दाची घाणी ।
अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर ।
तुका म्हणे परउपकार ॥३॥
अर्थ
ज्याच्या चित्तामधे प्रपंच्याची सतत हळहळ, तळमळ चालु असते, .त्याचे मला दर्शनहि होउ नये, तो जिवंत असुनही मेल्यासारखा आहे.ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये .तुकाराम महाराज म्हणतात जो दुसर्याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरहि परउपकार करत नाही, अश्या मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सदा तळमळ – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.