पोटीं जन्मती रोग ।
तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥१॥
रानीं वसती औषधी ।
तरि कां म्हणाव्या निपराधी ॥२॥
तैसें शरीराचें नातें ।
तुका म्हणे सर्व आप्ते ॥३॥
अर्थ
आपल्या पासून अनेक रोगांची उत्पत्ती होते मग त्या रोगांना आप्त म्हणवे का म्हणजे आपले म्हणावे का?रानामध्ये अनेक प्रकारच्या औषधी असतात मग त्यांना निरपराधी म्हणावे काय.तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्या शरीराचे ज्यांच्याशी हितकारक संबंध असते ते सर्व आपले आप्त असतात आपले असतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.