तुजवरी ज्याचें मन – संत तुकाराम अभंग – 327

तुजवरी ज्याचें मन – संत तुकाराम अभंग – 327


तुजवरी ज्याचें मन ।
दर्शन दे त्याचें ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव ।
हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥
अवघियांचा करूनि मेळा ।
तुज डोळां रोखिलें ॥२॥
तुका म्हणे तुज आड ।
लपोनि कोड दावीं देवा ॥३॥

अर्थ

हे हरी तुझ्यावर जे आसक्त आहेत ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे त्या भक्तांचे दर्शन मला घडू दे.त्यांची जाती व त्यांचा भाव हे किती शुद्ध आहे हे सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्या हाताला पायांना व सर्वांगाला तुझ्या भक्ती वाचून दुसरा व्यापारच नाही.त्या भक्ताने त्याच्या सर्व इंद्रियांचा मेळा करून त्याचे डोळे फक्त तुझ्या स्वरूपावरच रोखले आहेत.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझ्या आड लपेल आणि ते भक्त आले की मला त्या भक्तांचे दर्शन घडू दे एवढे माझे कोड तू पूर्ण कर.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.