आविसाचये आशा गळ गिळी मासा – संत तुकाराम अभंग – 326

आविसाचये आशा गळ गिळी मासा – संत तुकाराम अभंग – 326


आविसाचये आशा गळ गिळी मासा ।
फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥
मरणाचे वेळे करी तळमळ ।
आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा ।
तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥

अर्थ

मासे पकडण्याचे जे सामुग्री असते त्याच्या टोकाला मासे पकडण्यासाठी माशाला आमिष म्हणून लावलेले असते मग मासा त्या आमिषाला बळी पडून तो गळ तोंडात पकडतो व घसा फुटून मरण पावतो.मग मरणाच्या वेळी तो तळमळ करतो व त्या वेळी त्या कृपाळू देवाचे स्मरण करतो.तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी मरणाच्या वेळेस जो देवाचे नामस्मरण करतो त्याच्या सुखाला पारावर नाही कारण तो वैकुंठाला जातो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.