कोणतें कारण राहिलें यामुळें ।
जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥१॥
नाहीं जात जीव होत नाहीं हानी ।
सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥
नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी ।
अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥२॥
हें तों तुज कळों येतसे अंतरीं ।
लापणीक वरी साच भाव ॥३॥
तुका म्हणे देवा नासिवंतासाठीं ।
पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥४॥
अर्थ
माझे असे कोणते काम अडले होते म्हणून मी तुला मुद्दाम बोलावून घेईन तुला कष्ट देईन.माझा काय जीव जाणार नव्हता किंवा माझ्यावर काही प्रसंग ओढावला नव्हता पण मला सहजच तुझे स्मरण झाले त्यामुळे मी तुला आठविले.देवा मला कसलीही चिंता नाही किंवा मी उपवासी आहे असे नाही मला अन्नधान्य किंवा गायी म्हैसी असावे असेही वाटत नाही. महाराज म्हणतात देवा माझ्या अंतरंगात खरा भाव आहे की खोटा भाव आहे याचे तुला चांगलेच ज्ञान आहे.तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा हे माणसे तुम्हाला नाशिवंत पदार्थासाठी बोलावितात व तुमच्या पायाचे स्मरण न करून नुसकान करून घेतात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.