तीर्थें केलीं कोटीवरी – संत तुकाराम अभंग – 324
तीर्थें केलीं कोटीवरी ।
नाहीं देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचें ज्यालेंपण ।
न देखे चि समचरण ॥ध्रु.॥
योग याग अनंत केले ।
नाहीं समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायीं ।
अनंत तीर्थे घडिलीं पाहीं ॥३॥
अर्थ
कोट्यावधी तीर्थे केली आणि जर पंढरी नाही पाहिली,तर त्याच्या जगण्याला आग लागो कारण त्याने विटेवर उभे असलेले पांडुरंग परमात्म्याचे समचरण पाहिले नाही.त्याने योगा आणि योग अनेक केले पण जर विटेवरील समचरण पाहिले नाहीतर त्याचा काय उपयोग?तुकाराम महाराज म्हणतात विटेवर उभा असलेला पांडुरंग याचे तुझे दर्शन घेतले तरच सर्व प्रकारचे तीर्थे घडले असे जाण.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.