सोयरिया करी पाहुणेरु बरा – संत तुकाराम अभंग – 322

सोयरिया करी पाहुणेरु बरा – संत तुकाराम अभंग – 322


सोयरिया करी पाहुणेरु बरा ।
कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥
गाईसी देखोनि बदाबदा मारी ।
घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥
फुले पाने वेश्येसी नेतसे उदंड ।
देऊं नेदी खांड ब्राम्हणासी ॥२॥
बाइलेच्या गोता आवडीने पोसी ।
मातापितयांसी दवडोनी ॥३॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी ।
जातो यमपुरी भोगावया ॥४॥

अर्थ

नास्तिक मनुष्य जर घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी मोठी मेजवानी करतो पण जर संत घरी आले तर त्यांच्यासाठी मात्र ठोमरा म्हणजे जाड तांदळाचा भात करतो.त्याच्या दारात जर गाय आली तर तो त्या गाईला बदाबदा मारतो पण त्याला घोड्याचे लीद काढणे खरारा करणे यातच गोडपणा वाटतो.नास्तिक मनुष्य वैश्येला फुले, खाण्यासाठी पाने नेऊन देतो मात्र ब्राम्‍हणाला सुपारीचे एक खांड देत नाही.सासरकडच्या माणसांना तो अतिशय जीव लावतो पण आई-वडलांना घराच्या बाहेर काढून देतो.तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंका त्याचा धिक्कार करा असा माणूस नरकातच जाणार कारण तेथेच त्याचे भोग त्याला मिळणार आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.