बरवा बरवा बरवा देवा तूं ।
जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥१॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन ।
जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥
अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण ।
वर्णितां लक्षण रे देवा ॥२॥
मन जालें उन्मन अनुपम गहण ।
तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥३॥
अर्थ
देवा तू खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस, खूपच चांगला आहेस. त्यामुळे तु मला जीवापेक्षाही जास्त आवडतोस देवा. तुझे मुख डोळ्याने पाहिल्यानंतर व तुझे गुण कानाने ऐकल्यानंतर डोळे व कान दोन्ही संतुष्ट होतात देवा. तुझे लक्षण वर्णन केले असता माझ्या आठही अंगातून शीण आणि सर्व भाग नाहीसा होतो. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात देवा तुझ्या अनुपम्य आणि गहण अशा रूपाने माझे मन उन्मन झाले व तुझा महिमा मला काही कळत नाही रे देवा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.