बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें – संत तुकाराम अभंग – 320
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें ।
संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत ।
ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥
जालीं दोनी नामें एकाचि मथनीं ।
दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥
तुका म्हणे दाखविली मुक्ताफळीं ।
शिंपलेचि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥
अर्थ
आतापर्यंत या संसाराला मी कवटाळून बसलो होतो पण आता आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने मी यातून बाहेर पडलो. दह्यातून निघलेले ताक जसे पुन्हा दह्यात मिसळले जात नाही तसा मी या संसारात पुन्हा मिसळणार नाही. दह्यातून जसे ताक आणि लोणी हे दोन नावं निर्माण होतात पण त्यांचे गुण वेगवेगळे असतात तसेच आत्म विचाराने देह आणि आत्मा हे वेगळे वेगळे आहे असे लक्षात येते.तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्यातून जरी मोती वेगळा केला व नंतर पुन्हा त्याला शिंपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते शिपल्या संगे जोडले जात नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.