आशाबद्ध वक्ता – संत तुकाराम अभंग – 318

आशाबद्ध वक्ता – संत तुकाराम अभंग – 318


आशाबद्ध वक्ता ।
धाक भय श्रोतयाच्या चित्ता ॥१॥
गातो तेची नाही ठावे ।
तोंड वासी काही द्यावे ॥ध्रु .॥
जाले लोभाचे मांजर ।
पोट भरी दारोदार ॥२॥
वांयां गेलें तें भजन ।
उभयतां लोभी मन ॥३॥
बहिरेमुके एके ठायीं ।
तैसें जालें तया दोहीं ॥४॥
माप आणि गोणी ।
तुका म्हणे रितीं दोन्ही ॥५॥

अर्थ

एखादा वक्ता हरिकीर्तन करण्याकरता हरी कथा करण्याकरता एखाद्या गावात जर आला आणि त्याच्या मनात द्रव्याची आशा असेल तर त्या गावातील श्रोतेत्यांच्या चित्तात हा आपल्याला द्रव्य मागेल असाच धोका निर्माण होतो.ज्या भगवंताविषयी तो गातो त्या भगवंताविषयी त्याला काहीच ज्ञान नसते परंतु तो आवेश धरून तोंड वासून गाणी गातो पण त्याच्या मनात चाललेले विचार म्हणजे यांनी मला माझे गाणे ऐकून मला पैसे द्यावे असे असते.तो वक्ता म्हणजे लोभाचे झालेले मांजर होय पोट भरण्याकरता तो दारोदार फिरत असतो.त्याने गायलेले भजन आणि श्रोत्यांनी ऐकलेले भजन हे दोन्हीही वयाला जाते कारण दोघांचेहीमन लोभी असते.बहिरा आणि मुका हे जसे एकत्र आल्यावर व्यर्थ होय तसेच आशाबद्ध वक्ता व त्याच्या कथेला भूललेला श्रोता हे दोन्ही एकत्र येणे म्हणजे तसेच होय.तुकाराम महाराज म्हणतात गोणीतून धान्य मापाने बाहेर काढल्यावर जसे गोणी आणि माप दोन्हीही मोकळेच राहतात तसेच आशा बद्ध वक्ता आणि त्याला भूललेला श्रोता हे दोन्हीही तसेच रिकामे राहतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.